विकासाच्या वाटेवर पुढे जाणारे गाव – कळंबा बु
कळंबा बु हे अकोला जिल्ह्यातील बालापूर तालुक्यातील एक कृषीप्रधान व विकसित होत असलेले गाव आहे. सुपीक जमीन, मेहनती शेतकरी आणि शांत ग्रामीण वातावरण ही गावाची वैशिष्ट्ये आहेत. ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामे राबवून गाव आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे.
गोपाल केशवराव उगले
सरपंच
आमच्याबद्दल
कळंबा बु – ग्रामीण प्रगतीचे उदाहरण
"हे गाव शेतीप्रधान असून येथील लोकांचे जीवन शेती आणि पारंपरिक संस्कृतीशी जोडलेले आहे. कापूस, सोयाबीन, गहू यांसारखी पिके येथे घेतली जातात. गावात शिक्षण, पाणीपुरवठा, वीज आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायतीमार्फत विविध शासकीय योजना राबवून गावाच्या विकासाला चालना दिली जात आहे."
2500
गावाची लोकसंख्या
685
एकूण कुटुंबे
पंचायत टीम
ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी
पर्यटन आणि संस्कृती
पाहण्यासारखी ठिकाणे
श्री स्वयंभू महादेव मंदिर, अंत्री मलकापूर
"अंत्री मलकापूर येथील हे एक अत्यंत प्राचीन आणि जागृत शिवमंदिर आहे. येथील शांत, ध्यानमयी आणि निसर्गरम्य वातावरण भाविकांना मनःशांती देते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी आणि पूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिर परिसरात एक सुंदर बाग देखील आहे."
अधिक माहिती
श्री संत गोमाजी महाराज मंदिर, श्री क्षेत्र नागझरी
"श्री क्षेत्र नागझरी हे शेगावनजीक असलेले एक अत्यंत शांत, निसर्गरम्य आणि पवित्र आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे. १८ व्या शतकातील महान संत श्री गोमाजी महाराज यांचे हे समाधी स्थळ आहे. या ठिकाणी वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. मंदिराच्या परिसरात नैसर्गिक पाण्याचे गरम आणि गार पाण्याचे झरे (कुंड) असून, या पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी भाविक येथे आवर्जून येतात. येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी दररोज सकाळी ११ वाजता मोफत महाप्रसादाची (भोजन) व्यवस्था केली जाते."
अधिक माहिती
श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव
"श्री गजानन महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर स्वच्छ, शांत व सुंदर असून भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत."
अधिक माहितीसंपर्क आणि सहभाग
नागरिक संवाद
७/१२
ऑनलाईन उताऱ्यासाठी
दाखले
विविध प्रकारचे दाखले
मतदार यादी
आपले नाव तपासा
चालू कामे
गावाचा विकास प्रकल्प
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) पुरस्कार योजना - मूल्यमापन
कळंबा बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये 'आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) पुरस्कार योजना २०२३-२४' अंतर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात समितीच्या सदस्यांनी गावातील विकास कामांचे आणि प्रशासकीय कामकाजाचे सूक्ष्म मूल्यमापन केले. गावचा सर्वांगीण विकास, स्वच्छता आणि स्मार्ट ग्राम योजनेच्या निकषांची पूर्तता यावर यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
होळीचे नैसर्गिक रंग तयार करणे - प्रशिक्षण कार्यक्रम
कृषी विज्ञान केंद्र, अकोला (सिसा, उदेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने 'होळीचे नैसर्गिक रंग तयार करणे' या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना रासायनिक रंगांऐवजी घरगुती आणि नैसर्गिक साहित्यापासून सुरक्षित रंग बनवण्याचे तंत्र शिकवणे हा होता. या प्रशिक्षणातून महिलांना स्वयंरोजगाराचे कौशल्य प्राप्त झाले असून, पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर - कळंबा बु.
कळंबा बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत गावकरी आणि ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध आरोग्य सेवा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्यास मदत झाली.
बातम्या
गावातील घडामोडी
वाण नदी जलवाहिनी दुरुस्ती - पाणीपुरवठा सूचना
मुख्य जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे उद्या गावाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ग्रामस्थांनी पाण्याची साठवणूक करून सहकार्य करावे, ही विनंती. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल.
मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रा प कळंबा .बु येथे दिनांक 18 मे 2023 ग्रा .प कळंबा बु आणि गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विधमाने महा आरोग्य शिबिराचे आयोजन सरपंच श्री .गोपाल पाटील यांनी केले . या शिबिराचे उदघाटन मा .आमदार नितीनबापू देशमुख ,प.स .सदस्य श्री योगेशवर भाऊ वानखडे , मा .तहसीलदार तायडे साहेब, मा. गट विकास अधिकारी मोरे साहेब , उरळ प्रा . आरोग्य केंद्र वाडेकर सर व डाबेराव मॅडम यांनी केले . या शिबिरास कळंबा. बु गावातील नागरिक आणि आजूबाजूच्या गावातील 300 नागरिकांनी आपल्या कान ,नाक ,घसा,डोळे,मुतखडा , अस्थीरोग ,स्त्रीरोग ,एनजिओग्राफी, या रोगाचे निदान केले . या शिबीरास मनारखेड ,कसुरा, ,कळंबी महागाव या गावाचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते .हे शिबीर यशस्वी होण्यासाठी गावातील ग्रा प कळंबा बु सदस्य ,कर्मचारी , मित्र मंडळी याचे मोलाचे योगदान आहे. या शिबिरास उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी ,अधिकारी , नागरिक , ज्यांनी रुग्णांना सेवा दिली ते डॉक्टर त्या सर्वांचे मनापासून आभार
वार्षिक आमसभा व ग्रामसभेचे आयोजन
आज दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी ग्रामपंचायत कळंबा बु ग्राम सभा घेण्यात आली. येथे नवनिर्वाचित सरपंच गोपालभाऊ केशवराव उगले तसेच उपसरपंच सौ ज्योतीताई ढोले आणि सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व सचिव व्ही एम कदम साहेब यांच्या पुढाकारातून आज कळंबा बु येथे महिला सभा निमित्त यशोदोचे ट्रेनर एडवोकेट गुरु मॅडम महिला सक्षमीकरणाचे मार्गदर्शक तसेच महिला बचत गटाचे बेलोकार मॅडम आणि पंचायत समिती बाळापुर येथील विस्तार अधिकारी पजई साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन या विषयी कळंबा बु यामधील महिला बचत गटांनी आणि महिला सदस्य लाभ घेतला यामध्ये महिला शोषण आणि महिला बचत गटाविषयी संपूर्ण माहिती देण्यास आली महिला सभा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला
जलद दुवे
महत्वाच्या सेवा व सोयी
ग्रामसभा
नोंदणी
कर भरणा
शिक्षण
आरोग्य
पाणी पुरवठा
तातडीची मदत
आणीबाणीच्या वेळी संपर्क करा
आम्ही आपल्या सुरक्षेसाठी २४/७ तत्पर आहोत.
आपत्कालीन हेल्पलाईन
२४/७ मदतीसाठी उपलब्ध
आमच्याशी संपर्क साधा
ग्रामपंचायत आपल्या
सेवेसाठी सज्ज आहे.
कार्यालय पत्ता
ग्रामपंचायत कार्यालय कळंबा बु, मु. पो. कळंबा बु, तालुका- बालापूर, जिल्हा- अकोला, महाराष्ट्र
फोन नंबर
7057971912
ईमेल
gpkalambabk@gmail.com
शासकीय महत्वाचे दुवे
शासकीय महत्वाचे दुवे
महत्वाच्या शासकीय संकेतस्थळांचे दुवे