छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रा प कळंबा .बु येथे दिनांक 18 मे 2023 ग्रा .प कळंबा बु आणि गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विधमाने महा आरोग्य शिबिराचे आयोजन सरपंच श्री .गोपाल पाटील यांनी केले . या शिबिराचे उदघाटन मा .आमदार नितीनबापू देशमुख ,प.स .सदस्य श्री योगेशवर भाऊ वानखडे , मा .तहसीलदार तायडे साहेब, मा. गट विकास अधिकारी मोरे साहेब , उरळ प्रा . आरोग्य केंद्र वाडेकर सर व डाबेराव मॅडम यांनी केले . या शिबिरास कळंबा. बु गावातील नागरिक आणि आजूबाजूच्या गावातील 300 नागरिकांनी आपल्या कान ,नाक ,घसा,डोळे,मुतखडा , अस्थीरोग ,स्त्रीरोग ,एनजिओग्राफी, या रोगाचे निदान केले . या शिबीरास मनारखेड ,कसुरा, ,कळंबी महागाव या गावाचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते .हे शिबीर यशस्वी होण्यासाठी गावातील ग्रा प कळंबा बु सदस्य ,कर्मचारी , मित्र मंडळी याचे मोलाचे योगदान आहे. या शिबिरास उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी ,अधिकारी , नागरिक , ज्यांनी रुग्णांना सेवा दिली ते डॉक्टर त्या सर्वांचे मनापासून आभार
ताज्या घडामोडी
डिजिटल
दाखले मिळवा
आता जन्म, मृत्यू, आणि रहिवासी दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज करा आणि रांगा टाळा.
अर्ज करा