सूचना फलक
"ग्रामपंचायतीच्या अधिकृत घोषणा, निविदा, आणि महत्वाच्या सूचनांची माहिती येथे मिळेल."
मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्याबाबत आवाहन
कळंबा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सर्व मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते की, आपल्याकडील थकबाकी असलेली घरपट्टी व पाणीपट्टी लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालयात येऊन भरणा करावी. वेळेवर कर भरून सहकार्य करावे.
विशेष ग्रामसभा सूचना - कळंबा बुद्रुक
सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की, आगामी काळातील विकासकामांच्या नियोजनासाठी व सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी या ग्रामसभेस वेळेवर उपस्थित राहावे, ही विनंती.
महत्वाच्या सूचना:
ही माहिती ग्रामपंचायतीच्या अधिकृत रेकॉर्डनुसार आहे. मुळ कागदपत्रांसाठी किंवा अधिक माहितीसाठी कृपया ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा.